शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (07:55 IST)

गुरुद्वारामध्ये जमा असलेले सोनं लोकं कल्याणासाठी वापरणार

नांदेड येथील तख्त श्री हजूर साहिब मागील 50 वर्षांपासून गुरुद्वाराला मिळालेल्या सोन्याचा वापर वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी होणार आहे. या मिळालेल्या सोन्याचा वापर रुग्णालय बांधण्यासाठी तसेच सर्व लहान-मोठ्या आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी केला जाणार आहे. ही घोषणा जत्थेदार कुलवंत सिंह यांनी केली आहे. ते म्हणाले की, "नांदेडच्या लोकांना उपचार घेण्यासाठी हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरात जावे लागेल. नांदेडमध्ये एखादे चांगले रुग्णालय बांधले गेले तर लोकांसाठी हे फायद्याचे ठरेल." 
 
या गुरुद्वारामधून लोकांना आधिपासूनच ऑक्सिजन सिलिंडर्स तसेच औषध आणि जेवणाची व्यवस्था केली जात आहे. गुरुद्वाराकडून केलेल्या या घोषणेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. यात असे म्हटले आहे की, 'गुरुद्वारामध्ये जमा असलेले सोनं लोकं कल्याणासाठी वापरले जाईल.'