गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : बुधवार, 9 जून 2021 (13:03 IST)

'बाबा का ढाबा' पुन्हा रस्त्याच्या कडेला, रेस्टॉरंट पडलं बंद

'Baba Ka Dhaba' again returned from the new restaurant on the roadside
बाबा का ढाबा, पुन्हा एकदा हे नाव चर्चेत आहे. प्रत्येकाला दिल्लीच्या मालवीय नगरातील बाबा का ढाबा आठवलं असेल. बाबा पुन्हा जुन्या ठिकाणी परत आल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे. बाबा कांता प्रसाद यांचे रेस्टॉरंट बंद करुन जुन्या जागी परतले. बाबा कांता प्रसाद यांनी गेल्या डिसेंबरमध्ये रेस्टॉरंट उघडले आणि 15 फेब्रुवारीला बंद केले. रेस्टॉरंट का बंद करावे लागले आणि मिळालेल्या पैशांचे काय झाले.
 
माध्यमांशी बोलताना बाबा कांता प्रसाद म्हणाले की, रेस्टॉरंटचा खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त होता आणि उत्पन्न-35- 40 हजार रुपये होते. यामुळे रेस्टॉरंट बंद करावं लागलं. कांता प्रसाद यांनी सांगितले की रेस्टॉरंटचे भाडे 35 हजार आहे, कुक आणि इतर कर्मचार्‍यांचा खर्च 36 हजार आहे आणि वीज आणि पाण्याचे बिल एकत्र करुन सुमारे एक लाखाहून अधिक आहे. उत्पन्न कधी- कधी 40 ते 45 हजार रुपये मिळत असल्याने निर्णय घ्यावा लागला.
 
बाबांचे मॅनेजर आणि वकील कोठे गेले विचारल्‍यावर बाबा म्हणाले की प्रत्येकजण निघून गेला. सोशल मीडियावर आवाहन झाल्यानंतर लोक बाबांच्या मदतीसाठी पुढे आले आणि पैसे देऊनही मदत केली. त्या पैशांचे शेवटी काय झाले? यावर बाबा म्हणाले की यापूर्वी माझ्या खात्यात किती पैसे आहेत हे मला माहित नव्हते. 45 लाख रुपये असल्याचे वृत्तपत्रातून समजले. प्रथम ते 39 लाख आणि नंतर 45 लाख होते. माझे घर बांधले आणि काही पैसे खर्च झाले, आता माझ्याकडे फक्त 19 लाख रुपये शिल्लक आहेत.
गौरव वासन यांच्याशी मतभेद आहे का ? विचारल्‍यावर बाबा म्हणाले की नकळत काही चूक घडली परंतु गौरव वासन आम्हाला मदत केली त्याच्याविरूद्ध आम्ही तक्रार केली नाही. मागील वर्षी बाबांची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती.
 
यू-ट्यूबर गौरव वासनने त्यांचा व्हिडिओ तयार केला होता जो खूप व्हायरल झाला होता आणि दिल्लीतील लोकं त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते, मग बाबा का ढाबा प्रसिद्ध झाला होता. बाबा अर्थात कांता प्रसाद यांना मदत म्हणून खूप पैसे मिळाले. नंतर त्या पैशांसाठी त्यांचं गौरव वासन यांच्यासोबत वाद देखील निर्माण झाले, प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं होतं. आता एकदा पुन्हा बाबा आपल्या जुन्या जागेवर पोहचले.