गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified गुरूवार, 27 मे 2021 (13:56 IST)

प्रसिद्धीसाठी क्रूरतेचा कळस, फुगे बांधत कुत्र्याला हवेत उडवलं

सोशल मीडीयावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वाट्टेल त्या थराला जातात पण एका तरुणाने प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोठी क्रुरतेची परिसीमा गाठली आहे. युट्युबवर व्हिडीओद्वारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका तरुणाने श्वानाचा जीव धोक्यात टाकला. त्याने पाळीव श्वानाला फुगे बांधुन हवेत उडवण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे.
 
गौरव शर्मा या ३२ वर्षीय युवकाने एक व्हिडीओ तयार केला. यात त्याने हेलियमच्या फुग्यांना एका पाळीव कुत्रा बांधला नंतर फुगे हवेत सोडल्यानंतर कुत्रा देखील हवेत उडू लागला. झालेल्या प्रकारामुळे त्या श्वानाचा जीव धोक्यात आला होता. यामुळे त्या कुत्र्याला त्रास दिल्याची तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलिसांनी या युट्यूबरला अटक केली आहे. 
 
“गौरव झोन” चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्याच व्हिडिओमध्ये, यूट्यूबर एका अरुंद रस्त्यावर चारचाकी वाहत्या वर बसून हायड्रोजन फुगे वापरुन डॉलरला हवेत उडतो. कुत्रा इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील बाल्कनीमध्ये तरंगताना दिसत होता.
 
या प्रकरणी गौरव आणि त्याच्या आईविरूद्ध दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर पोलिस ठाण्यात कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर त्याने ‘फ्लाइंग डॉग’ व्हिडिओ का हटविला हे सांगत माफीनामा व्हिडिओ टाकला. तो म्हणाला की त्याने कुत्र्याला उडण्याआधी सर्व सुरक्षिततेचे उपाय घेतले.
 
२१ मे रोजी या व्हिडीओचे चित्रीकरण करण्यात आले होते. सोशल मीडीयावर व्हायरल या व्हिडीओवर अनेक पशुप्रेमीनी संताप व्यक्त केला. आता हटविण्यात आलेल्या या व्हिडिओत काही जण आणि पाळीव कुत्रा डॉलर दिसत होता. रंगीबेरंगी हायड्रोजन बलून्स कुत्राच्या शरीरावर बांधले होते. 
 
सोशल मीडियावर या तरुणाविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि Corrupt YouTubers ने यावर व्हिडिओ शेअर केला आहे-