शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (11:44 IST)

Tea quotes for Tea lovers मराठी चहा कोट्स

कॉफी म्हणजे प्रेम
चहा म्हणजे आयुष्य
 
माझ्या आयुष्यात तिला सुद्धा तितकंच महत्त्व आहे
जितकं Tea ला आहे
 
चहाची वेळ नसते
पण वेळेला चहाच लागतो
 
Tea आहे
म्हणून मी आहे
 
जिथे Tea
तिथे मी
 
एक साधा प्रश्न विचारला मी त्याला
की प्रेम म्हणजे काय आहे तुझ्यासाठी
त्याने एक शब्द बोलून मला गप्प केलं
'चहा'
 
इच्छा तेथे मार्ग
चहा तिथे स्वर्ग
 
काचेच्या ग्लासमध्ये चहा पिण्याची जी मजा आहे
ती पेपरच्या कप मध्ये कुठे
 
मस्त पडलीये गारठवणारी थंडी
सोबतीला गरमा गरम चहा
रुसव्या फुगव्यांना बाजूला सारून
थोडा एकमेकात संवाद होतो का पहा
 
चहा हा एक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे
संवादातली वादळे शांत करण्याचा
मनातलं काहूर मिटवण्याचा
मोठ्या चर्चा करण्याचा
 
प्रेमाचं मिश्रण आठवणींच्या मंद आचेवर ठेवले की 
झाला आपला दोन कप मैत्रीचा चहा
 
अमृत म्हणा विष म्हणा
काही फरक पडत नाही
वेळेवरती चहा हवा
बाकी काही म्हणणं नाही
 
रात्री तुझी आठवण आणि सकाळी चहा
आवडत आपल्याला
 
आता चहा तू बनवला म्हटलं
की साखरेची गरज काय
 
चहा प्यायला बोलावलं तर
वातावरण घरच्यासारखं बनत
आणि तुझं कॉफीला बोलणं
ऑफिस सारखं वाटतं
 
एकवेळ ती नसली तरी चालेल
पण Tea पाहिजेच
 
चहा आणि बिस्कीट
तसं तू आणि मी
 
टेल मी थ्री मॅजिकल वर्ड्स
'चल चहा पाजतो'
 
चहा एवढं हॉट
कोण नाय आपल्या लाईफमध्ये
 
राहणारा चहा तो पेल्यात अर्धा
गोडवा आठवणींचा घेऊन येतो सदा
 
सकाळचा चहा म्हणजे आनंद पर्वणी
घोट घेत घेत त्याची चव अनुभवावी
बाहेर असावा रिमझिम हळवा पाऊस
जुन्या आठवणींची मनात गर्दी व्हावी
 
दिवसेंदिवस चहाच्या टपरी वरील
कप एवढे लहान होत चाललेत
की कळतच नाही चहा पितोय
की पोलिओचा डोस
 
आल्याचा तो स्वाद वाफाळणारा सुगंध
चहाचा तो प्याला करतो मन बेधुंद
 
मिळाली असेल प्रत्येकाला डेट
त्या स्टारबक्स सीसीडी च्या कॉफी मध्ये
पण मला माझं प्रेम सापडलं
त्या रस्त्यापल्याड टपरीवरचा चहा मध्ये
 
वेळेला सिगारेट तिघात एक चालेल
पण चहा मात्र 3 कपच लागतो
 
खूप चटके सोसलेल्या वरच कडकपणा येतो
मग तो चहा असो की आयुष्य
 
किती व्यसन करावे एकाच वेळी
ती पाउस आणि चहा
 
वेळेला एक कप चहा सुद्धा
खूप सुख देऊन जातो
 
माझ्या दिवसाची सुरुवात तू
माझ्या दिवसाचा शेवट सुद्धा तूच
 
चहाला वेळ नसते
पण वेळेला चहा हवाच
 
टेन्शन सोडा
मस्तपैकी चहा प्या
 
तिळगुळ खाताना
तो खूप गोड बोलायचा
पण चहा पिताना
फक्त मान डोलायचा
 
चहा सारखं प्रेम केलं होतं तुझ्यावर
सकाळ-संध्याकाळ नाही भेटलो तर डोकं दुखायचं
 
मजबूत नातं आणि कडक चहा बनायला वेळ लागतो
पण एकदा तयार झालं की काम फिट
 
जोडी तुझी माझी जशी चहा खारी
जोडी तुझी माझी जशी गझल अन शायरी
 
तू चहा सारखं माझ्यावर प्रेम तर कर
बिस्किट सारखं तुझ्यात बुडालो नाही तर सांग
 
दररोज सकाळी आयता चहा करून
देणारी हवी आता आयुष्यात
 
गोडवा तिच्या स्मितहास्याचा भरभरून असायचा
विना साखरेचा चहा पण तिच्या हातून गोड व्हायचा