शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (15:39 IST)

मसाला चहाचे एवढे फायदे जाणून नक्कीच सेवन करण्यास सुरुवात कराल

चहाचे अनेक प्रकार आहे पण पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल चहाच्या ऐवजी ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी यांना प्राध्यान्य मिळू लागले आहे. आपल्या पारंपरिक चहामध्ये काही मसाले घालून ते इतर चहापेक्षा अधिक फायदेशीर होऊ शकतात. मसाला चहा बनविण्यासाठी ज्या मसाल्यांची गरज असते ते आपल्या घरात सहजरीत्या उपलब्ध असतात, जसे की लवंग, वेलची, आलं, दालचिनी, तुळस आणि चहापत्ती. चहामध्ये वापरले जाणाऱ्या या सर्व मसाल्यांचे आपले फायदे आहे. विचार करा हे सर्व मसाले एकत्ररित्या वापरले तर या पासून मिळणारे फायदे किती पटीने वाढतील. चला तर मग जाणून घेऊ या की मसाला चहा कशा प्रकारे अधिक फायदेशीर सिद्ध होऊ शकतो.
 
 
1 अँटी इंफ्लेमेट्री गुणधर्म- 
मसाला चहाचे मसाले शरीरात कोणत्याही प्रकाराची सूज कमी करण्यासाठी प्रभावी असतात. या मध्ये आलं आणि लवंग सर्वात महत्त्वाचे आहेत. 15 मिनिटे पाण्यात उकळल्यामुळे या दोन्ही मसाल्यांचे गुणधर्म पाण्यात मिसळून जातात. हे दोन्ही मसाले वेदना कमी करण्यात उपयुक्त आहे.
 
2 थकवा दूर करतं -
 जर आपण दिवसभराचे थकलेले आहात, तर एक कप मसाला चहा घेतल्यानं सर्व थकवा दूर होऊ शकतो. या मध्ये असलेले टॅनिन शरीरास आराम देण्या शिवाय पुन्हा सामान्य उर्जावान होण्यास मदत करतं.
 
3 कर्क रोगाचा धोका कमी होतो - 
चहा मध्ये पडणारे सामान्य मसाले जसे की आलं,वेलची आणि दालचिनी मध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्स असतात, या मध्ये कर्करोगाविरोधी वैशिष्ट्ये असतात. कर्करोग काही अशा पेशींमुळे होते ज्या आकाराने आणि अंकाने सतत वाढतच जातात. जर आपण या मसाल्यांचा वापर नियमितपणे केला तर पोटाच्या कर्करोगाच्या धोक्याला कमी करता येऊ शकतं. 
 
4 सर्दी पडसं पासून वाचवतं - 
हिवाळ्यात सर्दी -पडसं टाळणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. मसाला चहा मध्ये असलेले अँटीऑक्सीडेन्ट आणि फायटोकेमिकल आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यात मदत करतात. आलं हे आजारांशी लढण्याच्या क्षमतेसाठी फायदेशीर असतं. जर आपल्याला पडसं आहे तर मसालाचहा आपल्या ला उष्णता देतं.
 
5 पीएमएस दूर करतं - 
दालचिनी आणि आलं मासिक पाळी प्रीमॅन्स्ट्रूअल सिंड्रोम (पीएमएस) मध्ये होणारी वेदना दूर करून आणि हार्मोन्स मधील संतुलन बनविण्यात मदत करतं. या काळात जेव्हा गरम पाण्याच्या पिशवीने शेकून देखील आराम मिळत नसेल तर चहाचे सेवन करावे.
 
6 मेटॅबॉलिझम (चयापचय) शक्ती वाढवतं -
चहा मध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा नियमितपणे सेवन केल्यानं पचन आणि पँक्रियाझ मधील एन्जाईम्सला स्टिम्युलेट करतं.या मुळे ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. 
 
7 मधुमेहाची भीती कमी करतं -
हे इतर प्रकारच्या मधुमेह पासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असत. तसेच ही साखर खाण्याची इच्छा देखील कमी करते. दररोज हा चहा दोन कप मध्यम ते कडक प्यायल्याने फायदा देतं.