शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (10:16 IST)

हिवाळ्यात पुरेसे पाणी पिणं हे महत्त्वाचे आहे

हिवाळ्याचा हंगाम म्हणजे थंड वातावरण, ज्यामुळे आपण जाड उबेचे कपडे घालतो आणि आपल्या शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आग पेटवतो किंवा हीटर लावून स्वतःला उष्णता देतो. एवढेच नव्हे तर शरीर उष्ण राहावे त्यासाठी गरम पदार्थांचे सेवन देखील करतो. पण आपण हिवाळ्यात पुरेसे पाणी पितो का ? तर ह्याचे उत्तर नकारार्थीच असेल, कारण हिवाळ्यात थंड हवामान असल्यामुळे लोक कामी पाणी पितात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. चला तर मग आम्ही सांगत आहो की अखेर हिवाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची किती आवश्यकता असते.
 
वास्तविक जर हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर या साठी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. जरी आपल्याला हिवाळ्यात घाम येत नाही पण या हंगामात कमी पाणी प्यायल्यानं अनेक समस्या उद्भवू शकतात. जरी हिवाळ्यात पाणी पिणे उन्हाळ्याच्या हवामान एवढे सोपे नाही. पण तरीही आपल्याला पाणी पिणे आवश्यक आहे, जेणे करून आपले शरीर रोगमुक्त राहील.
 
हिवाळ्यात किमान तीन ते चार लीटर पाणी प्यावं. बरेच स्त्री रोग तज्ज्ञ मानतात की बायकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावं, कारण त्यांना मूत्रमार्गाच्या भागातील संसर्गाची समस्या होते. तसेच हे शरीरातील मेटॉबॉलिझ्म म्हणजे चयापचय, पचन आणि शोषण साठी फार महत्त्वाचे असते. सोडियम,युरिया आणि पोटॅशियम सारख्या विषारी घटकांना बाहेर काढण्यासाठी आणि तापमानाला सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जरी शरीर बरेच दिवस अन्ना शिवाय राहू शकतो पण पाण्याच्या शिवाय जगणे कठीण आहे.
 
उन्हाळ्यात घामाच्या रूपात पाणी शरीरातून निघून जातो. म्हणून आपण अधिक पाणी पितो. परंतु हिवाळ्यात परिस्थिती वेगळी असते. तरीही पाणी भरपूर प्यावं. त्वचेच्या सौंदर्याला टिकवून ठेवण्यासाठी पाणी मदत करतं. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, ह्याचे कारण पाण्याची कमतरता देखील असते. हेच नव्हे तर वयाच्या पूर्वीच सुरकुत्या पडणे देखील पाण्याच्या अभावी होते.
 
पुरेसे पाणी प्यायल्यानं वजन नियंत्रित राहते.आपल्या आहारात काकडी, खरबूज, कलिंगड सारख्या फळांना समाविष्ट करून आणि हिवाळ्यात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसे पाणी मिळते. उन्हाळा असो किंवा हिवाळा दोन्ही हंगामात पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. हेच नव्हे तर हिवाळ्यात थंड हवामान असल्याने आणि थंड कोरडे वारे असल्याने उन्हाळ्याच्या अपेक्षा जास्त सुस्तपणा जाणवतो. पण पाणी प्यायल्याने आपण ताजेतवाने होतो.