शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified शनिवार, 19 डिसेंबर 2020 (16:42 IST)

हिवाळ्यात वारंवार टॉयलेट जावं लागत असल्यास कारण आणि उपचार नक्की वाचा

हिवाळ्यात हवामान थंड होतं. हिवाळ्यात बऱ्याचशा लोकांना रात्रीच्या वेळी टॉयलेटला जास्ती वेळा जावे लागते. अशा परिस्थितीत बरेच लोक पाणी पिणे कमी करतात किंवा पितच नाही, जेणे करून त्यांना वारंवार टॉयलेटला जावे लागू नये. पण टॉयलेटला जाण्यापासून वाचण्याची ही सवय आपल्याला आरोग्यासाठी जड होऊ शकते. असे केल्याने आपल्याला पोटात संसर्ग देखील होऊ शकतो. तर आपल्याला गुप्तांगात खाज किंवा सूज येऊ शकते.
 
* हिवाळ्यात वारंवार टॉयलेटला का जावे लागते. 
वारंवार टॉयलेट केल्याने डायरेसिस सारखे त्रास उद्भवू शकतात, हा त्रास तेव्हा वाढतो जेव्हा शरीरातील तापमान कमी होतो. अशा स्थितीत या वर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. डायरेसिस पासून मुक्त होण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणं महत्त्वाचे आहे, म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावं. अधून-मधून पेय पदार्थांचे सेवन करून देखील हे नियंत्रित केले जाऊ शकते. हा विचार करू नका की पाणी कमी पिऊन आपण टॉयलेटला जाणे कमी करू शकतो, तर या मुळे डायरेसिसचा त्रास उद्भवू शकतो. अहवालानुसार, 30 वर्षाच्या नंतरच्या लोकांमध्ये ही समस्या अधिक सामान्य आहे. वयाच्या या टप्प्यानंतर, तीन लोकांपैकी एक जण टॉयलेट जाण्यासाठी रात्रीच्या वेळी उठतो. या शिवाय 65 वर्षानंतर तीनपैकी प्रत्येक दुसऱ्याला टॉयलेटला जाण्यासाठी उठावे लागते. रात्रीला मधून टॉयलेट येण्याच्या या आजाराला डॉक्टरांच्या भाषेत नॉकटूरिया असे म्हणतात.
 
* या वरील उपचार काय आहे-
 जेव्हा जास्त लघवी होते तेव्हा आपल्या किडनीला जास्त काम करावे लागते. या कारण लघवीचे प्रमाणही वाढते आणि वारंवार लघवी येते. शरीर अंतर्गत दृष्टया उष्ण राहणे देखील आवश्यक आहे. शरीराला सवय असते उन्हाळ्यात 36 -37 डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये राहण्याची, पण हिवाळ्यात शरीर थंडीमुळे थरथरू लागतं आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात. या रक्तप्रवाहाचा परिणाम थेट किडनीवर होतो. अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेट करण्या शिवाय गरम पदार्थ खाऊन देखील आपण लघवीच्या प्रमाणाला नियंत्रित करू शकतो. पण लघवी रोखणं योग्य नव्हे. आपण शरीराला गरम ठेवण्यासह गरम पाणी किंवा कोमटपाणी देखील पिऊ शकता, जेणे करून आपल्या शरीरात पाण्याची पूर्ती देखील होऊ शकेल आणि आपल्याला रात्रीच्या वेळी वारंवार टॉयलेटला जावे लागू नये.