शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 12 डिसेंबर 2020 (11:25 IST)

हिवाळ्यात खा पौष्टिक थालीपीठ

कणिक - १ वाटी, बेसन पीठ- १/४ वाटी, तांदूळ पीठ- १/४ वाटी, 1 कांदा (बारिक चिरून), मीठ- चवीप्रमाणे, लाल तिखट- २ चमचे, जिरे पूड- १ चमचा, हळद, हिंग- १/४ चमचा, तेल.
 
कृती : सर्वप्रथम कणकेत बेसन व तांदूळाचे पीठ घालावे. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, हिंग व जिरे पूड घालावी. नंतर बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेले कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यावे. मध्यम आकाराचे गोळे करून प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून जाडसर थापून घेणे. त्यावर २-३ छिद्र करावीत. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावे. लोणी किंवा बटर लावून दही व शेंगदाणा चटणी बरोबर खाण्यास देणे.