शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (11:51 IST)

गणपती नैवेद्य पदार्थ खिरापती शिवाय होऊच शकत नाही

खिरापत
साहित्य: 1 वाटी किसलेले सुके खोबरे, 1 चमचा खसखस, अर्धा वाटी खडीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, 1 चमचा किसमिस, 5-6 खारका, 5-6 बदाम
 
कृती:
एका पॅनमध्ये सुक्या खोबर्‍याला मंद आचेवर हलक्या तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. खसखस वेगळ्याने भाजून घ्यावी. खडीसाखर कुटून घ्यावी आणि खारकेची पूड तयार करुन घ्यावी. बदामाची आणि खारकेची पूड देखील भाजून घ्यावी. आता भाजलेले खोबरे, खसखस, बदाम-खारकांची पूड, खडीसाखर आणि वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये भरडसर खिरापत तयार करून घ्यावी.