बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (16:05 IST)

चिल्ली चना फ्राय

साहित्य - 
1 कप काबुली चणे किंवा हरभरे रात्रभर भिजवून ठेवलेले आणि उकळलेले, 1 कप कोर्नफ्लोर, तेल, 3 -4 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा, 3 मिरच्या, 1/2 कप ढोबळी मिरची, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, मीठ, काळी मिरपूड, 1/2 चमचा साखर, कांद्याची पात. 
 
कृती -
चिली चना बनविण्यासाठी सर्वप्रथम रात्रभर काबुली चणे भिजवून ठेवा. सकाळी कुकरमध्ये चणे पाणी आणि मीठ घालून उकळवून घ्या. उकळल्यावर गाळून घ्या जास्तीचे पाणी काढून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात चणे आणि कोर्नफ्लोर घाला. चांगल्या प्रकारे मिसळा आणि दुसऱ्या भांडयात काढून घ्या. थोडंसं पाणी आणि पुन्हा थोडं कोर्नफ्लोर घालून मिसळा.
 
एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर हे चणे घालून सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. जास्तीचे तेल काढून टिशू पेपर वर ठेवा. 
 
एका पॅन मध्ये तेल घालून गरम करायला ठेवा. गरम झाल्यावर यामध्ये हिरव्या मिरच्या, चिरलेले लसूण, चिरलेला कांदा घालून परतून घ्या. मग ढोबळी मिरची, मीठ, काळी मिरपूड, चवीपुरती साखर घालून शिजवून घ्या.

या मध्ये व्हिनेगर, टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस आणि पातीचा कांदा मिसळा. पाणी घालून सॉस शिजवून घ्या. सॉस दाट झाल्यावर यामध्ये फ्राय केलेले चणे घालून चांगल्या प्रकारे मिसळा. चविष्ट चिली चणे खाण्यासाठी तयार.