शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 मार्च 2021 (10:26 IST)

राहुल चाहरला टी-20 मध्ये मिळू शकेल संधी

इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी राहुल चाहरला भारतीय संघात सामील केले जाण्याची शक्यता आहे. चाहर कसोटी मालिकेदरम्यान राखीव खेळाडूच्या रूपात संघासोबत जैव सुरक्षित वातावरणात होता. वरूण चक्रवर्ती व राहुल तेवतिया यांच्या तंदुरूस्तीवर अद्यापपही संशय का आहे व ते जर अनफिट राहिले तर राहुलला संघात सामील केले जाऊ शकते. 
 
तेवतिया अहमदाबादमध्ये बाकी खेळाडूंसोबत सराव करत आहे तर चक्रवर्ती ट्रेनिंगचा भाग नाही व त्याला एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करण्यास सांगण्यात  आले आहे.