शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (09:55 IST)

नवीन सौंदर्य उत्पादन वापरण्यामुळे त्वचेवर होणाऱ्या Reaction साठी हे उपाय करा

त्वचेवर एखाद्या नवीन उत्पादनामुळे काही वाईट प्रतिक्रिया झाली असल्यास या टिप्स अवलंबवा.
काही नवीन सौंदर्य उत्पादन वापरल्यामुळे त्वचेवर लालसर पणा पासून वेदना जाणवू शकते.  कोणतेही उत्पादन थेट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आपण हे टेस्ट करणे विसरतात आणि परिणामी त्वचेवर वाईट परिणाम दिसून येतात. काही सोप्या टिप्स अवलंबवून आपण त्वचेला पुन्हा व्यवस्थित करू शकता. चला तर मग जाणून  घेऊ या. 

* मेकअप उत्पादनांना ब्रेक द्या -
जर आपल्याला एखाद्या सौंदर्य उत्पादना पासून त्वचेवर काही वाईट प्रतिक्रिया झाली असल्यास मेकअप उत्पादनांना काही वेळ ब्रेक द्या. काही उत्पादनां मध्ये अल्कोहोल, रेटिनॉल, कृत्रिम सुगंधे आणि रासायनिक एक्सफॉलिएटर असतात. जे आपल्या त्वचेच्या लालसरपणाला आणि जळजळ वाढवू शकतात. या साठी आपण काही दिवस मेकअप ला विश्रांती द्या. चेहऱ्याला दोनवेळा एखाद्या सौम्य फेसवॉश ने धुऊन घ्या. आणि त्याला मॉइश्चराइझ करा.  
 
* हार्श क्लिन्झर ला बाय म्हणा- 
त्वचेमध्ये जळजळ होण्याची समस्या असल्यास त्वचा स्वच्छ करण्यासाठी कधीही हार्श क्लिन्झर वापरू नका.चेहरा धुण्यासाठी सौम्य क्लिन्झर वापरा.हे आपल्या त्वचेला स्वच्छ करेल आणि जळजळ देखील कमी करेल.
 
* त्वचेच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या-
नवीन सौंदर्य उत्पादनाचा वापर केल्याने होणारी जळजळ त्वचेच्या वरील थराचे  नुकसान करते. अशा परिस्थितीत मॉइश्चरायझर आणि सिरम च्या साहाय्याने त्वचेची दुरुस्ती करू शकतो.   
 
* सुदींग जेल लावा-
त्वचेला नवीन सौंदर्य प्रसाधनामुळे त्रास झाला असल्यास रात्री सुदींग जेल लावा. या साठी आपण कोरफड जेल लावू शकता. हे त्वचेला हायड्रेट करून त्वचेची जळजळ कमी करतो.
 
* त्वचेची काळजी घ्या-
त्वचेवर एखाद्या सौंदर्य उत्पादनाचे वाईट परिणाम झाले असल्यास काही दिवस त्वचेवर बारीक निरीक्षण करा. जर दोन तीन दिवसात देखील काहीच अंतर होत नसेल तर अशा परिस्थितीत त्वचा रोग तज्ज्ञ ला दाखवावे आणि त्यांचा सल्ला घ्यावा.