1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (08:30 IST)

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे अवलंबवा

Follow this to reduce wrinkles on the face beauty tips in marathi
चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या येतातच या साठी काही गोष्टी अवलंबवावे जेणे करून चेहरा स्वच्छ होऊन नितळ होईल. 
 
1 त्वचेची टोनींग करा- 
* चेहरा तेलकट असल्यास  तर गुलाब पाणी घेउन त्यात लिंबाचा रस मिसळा यामुळे त्वचेत तेल बनत नाही .
 
* त्वचेचे छिद्र मोठे असल्यास गुलाब पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे आईस क्यूब बनवून रात्री चेहऱ्याची टोनींग करा. 
 
2 चेहऱ्याची मॉलिश करा  -
या साठी दुधाची थंड मलाई देखील वापरू शकता. त्यात  लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर 5 मिनिटे मॉलीश करा.या मध्ये लॅक्टिक ऍसिड असतं.या मुळे चेहऱ्यावर घट्ट पणा येतो आणि सुरकुत्या कमी होतात. 
 
* रात्री झोपण्यापूर्वी किमान 5 ते 10 मिनिटे नियमितपणे चेहऱ्याची मॉलिश केल्याने रक्तप्रवाह चांगला होतो. या मुळे त्वचेवर चमक येते. रंग उजळतो. 
 
3 रात्री फेसपॅक लावा- 
* त्वचा सामान्य असल्यास रात्री कोरफडीचे जेल आणि व्हिटॅमिन ई तेलाला मिसळून पॅक बनवून लावून झोपा. सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. 
 
* कोरडी त्वचा असल्यास नारळाच्या तेलात चिमूटभर हळद मिसळून रात्रभर लावून ठेवा. 
 
* त्वचेवर मुरूम असल्यास बदामाची पेस्ट चेहऱ्यावर लावून झोपा.
 
* तेलकट त्वचा असल्यास चेहऱ्यावर ग्रीन टीचे पाणी आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी चेहरा धुवून घ्या.