सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (21:56 IST)

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा

आपल्या शरीरावर कोणत्याही प्रतिक्रियेमुळे बर्‍याचदा खाज सुटणे सुरु होते. खाज वेगवेगळ्या प्रकारे होते. एखाद्याला लवकर बरे वाटते तर एखाद्याला  24 तास खाज सुटते. घामोळ्या, पुरळ, एलर्जी असल्यास त्वचेवर पुरळ येत, त्वचा लालसर होते. 
अशा रिएक्शन किंवा प्रतिक्रियांवर घरगुती उपचार करून  देखील सुटका मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 नारळाचं तेल- नारळाच्या तेलाची प्रकृती थंड असते, म्हणून खाज होत असल्यास सर्वप्रथम नारळाचं तेल लावा. त्वचा लाल होत असल्यास,घामोळ्या झाल्यावर नारळाचं तेल लावू शकता. उन्हाळ्यात कृत्रिम दागिने घातल्यावर मुरूम होतात, या साठी आपण नारळाचं तेल आणि पावडर लावावे. 
 
2 कोरफड जेल- खाज येणाऱ्या भागावर कोरफड जेल लावा आणि हळुवार चोळून घ्या कोरफड जेल थंड असत. चेहऱ्यावर हे लावल्याने मुरूम, पुटकुळ्या नाहीशा होतात.
 
3 चंदन- उष्णतेमुळे खाज येत असल्यास खाज येणाऱ्या जागेवर आपण चंदन लावू शकता. या मुळे शरीरात थंडावा जाणवेल .खाज येणार नाही आपण चंदनाच्या ऐवजी मुलतानी माती देखील लावू शकता. या मुळे थंडावा मिळेल. 
 
4 दालचिनी - याचे सेवन करणे फायदेशीर आहे खाज येत असेल तर त्या भागावर दालचिनीमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून त्या जागी लावा .
 
5 कडुलिंबाचा रस- खाज येत असल्यास कडुलिंबाचा रस लावा कडुलिंबाची पानें पाणी घालून वाटून घ्या. पानांचा रस काढून खाज येणाच्या जागेवर लावा थोड्याच वेळात आराम मिळेल.