मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (09:30 IST)

मलईचे फायदे जाणून घेऊ या

आपण चेहऱ्यावर चमक आणि मऊ करायचे असेल तर मलई या साठी आपल्याला मदत करते मलई मध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते जे आपल्या त्वचेमधील टॅनिग दूर करण्यात मदत करते.   
मलईचा वापर आपण नियमितपणे त्वचेची काळजी घेण्यास केले तर काहीच दिवसात याचे परिणाम आपल्याला दिसू लागतील. काही खास टिप्स जाणून घेऊ या ज्याच्या मुळे त्वचा चमकदार होईल. 
 
* चेहऱ्यावर चकाकी साठी- मलईमध्ये लिंबाचा रसाच्या काही थेंबा घाला. या मध्ये अर्धा चमचा मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा 20 मिनिटं ठेवल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. आपल्या चेहऱ्याला हाताने कोरडे करा.
 
* त्वचा उजळण्यासाठी - चेहरा उजळण्यासाठी आपण मलईचा वापर नियमितपणे करा. या साठी आपण मलईचे उटणे देखील बनवू शकता. या साठी 1 चमचा मलई, 1 चमचा हरभरा पीठ,अर्धा चमचा मध मिसळा आणि आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. 10 मिनिटे ठेवल्यानंतर, स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
 
* टॅनिंग दूर करण्यासाठी - आपण चेहऱ्याच्या टॅनिग मुळे त्रस्त आहात तर या साठी मलई कामी येऊ शकते. 1 चमचा मलई मध्ये टोमॅटो आणि लिंबाचा रस मिसळा. हे चांगले मिसळल्यानंतर, ते टेनिंगच्या क्षेत्रावर लावा आणि ते कमीतकमी 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.