सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (20:57 IST)

ब्युटी टिप्स फॅशन च्या काळात नाकाचे केस काढू नये जाणून घ्या कारण

फॅशनच्या काळात मुली सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. त्या दिसतात सुंदर परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक असू शकते. सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यासाठी तयार असतात. केस काढण्यासाठी वॅक्सिन्ग आणि थ्रेडींग करतात. नाकाचे केस देखील काढण्याचा प्रयत्न केला जातो. असं करू नये नाकाचे केस काढणे हे आरोग्यासाठी धोकादायी आहे. हे आजारपणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. चला तर मग असं करणे धोकादायक कसे आहे हे जाणून घेऊ या. 
 
* नाकाचे केस आरोग्यासाठी महत्वाचे आहे- 
जस जस वय वाढते नाकाचे केस देखील वाढतात. ते नाकाच्या बाहेर येऊ लागतात. अजाणता आपण ते केस काढू लागतो. नाकाचे केस रक्षा प्रणालीचा एक भाग आहे जेव्हा आपण श्वासोच्छवास करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजन मिळते परंतु घाण शरीरात जात नाही. नाकाचे केस असल्याने बाहेरची धूळ,घाण,जिवाणू शरीरात जात नाही. आपण श्वासाच्या विकारा  पासून वाचतो. 
 एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या नाकात केस कमी होते किंवा ज्यांनी ते काढून टाकले त्यांना दमा होण्याची शक्यता अधिक वाढली. संशोधनानुसार नाकाचे केस आपल्या फुफ्फुसांना ऑक्सिजन फिल्टर करून पाठवतात. नाकाचे केस काढल्याने घाण आणि धुळीचे कण शरीरात प्रवेश करतात. श्वास संबंधी विकार होतात. 
 
* नाकाचे केस वाढल्यावर काय करावं ?
या साठी आपण चिकित्सकांच्या सल्ला घ्यावा किंवा कात्रीने थोडे-थोडे केस कापा.