शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (22:48 IST)

Fact Check: नाकात लिंबाचा रस घातल्याने कोरोनाचा नायनाट होईल तज्ज्ञाकडून जाणून घ्या

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अलोपेथिक औषधे घेतली जात आहे.या शिवाय इतर दुसरे उपाय देखील केली जात आहे. जेणे करून संसर्गापासून वाचता येऊ शकेल. कोरोनाच्या काळात वायरल पोस्टची खात्री केल्या शिवाय सांगितलेले उपचार करणे धोकादायक होऊ शकते. वायरल उपायांना डॉक्टरांच्या सल्ला घेतल्या शिवाय घेणं धोकादायक होऊ शकते. अलीकडेच एक व्हिडीओ सर्वत्र पसरत आहे की लिंबाचा रसाचा काही थेंबा नाकात घातल्याने कोरोनाचा नायनाट होईल. या केल्या जाणाऱ्या दाव्याची शहानिशा करण्यासाठी वेबदुनियाने काही आयुर्वेदिक तज्ञांशी चर्चा केली.चला  जाणून घेऊ या ते काय म्हणाले. 
डॉ. अनुराग जैन एमडी (आयुर्वेद) म्हणाले की,असं केल्याने नाकात साठलेला कफ निघून जातो. परंतु या संदर्भात असे काही ठोस पुरावे नाही की असं केल्याने कोरोनाचा नायनाट होतो. तसेच काही ही उपचार अवलंबविण्याच्या पूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. नंतरच नाकात काहीही घालावे. आपण नाकात नारळाचं तेल आणि साजूक तूप  लावू शकता. शास्त्रात देखील याचा उल्लेख आहे. 
 
 डॉ. अमित हार्डिया, एमडी (आयुर्वेद)- सांगतात की, वर्तमानात या संदर्भात असे कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नाही की लिंबाचा रसाचा काही थेंबा घातल्याने कोरोनाचा नायनाट होईल. अशा गोष्टींना वैज्ञानिक डेटा मिळाल्यावरच मंजूर केल्या पाहिजे. 
 
भारत सरकारच्या पीआयबीने देखील या वायरल व्हिडीओ ला सरासर चुकीचे सांगितले आहे. पीआयबी ने ट्विट मधून लिहिले आहे की 'सोशल मीडियावर पसरलेल्या व्हिडियो मधून दावा करण्यात येत आहे की नाकात लिंबाचा रसाचा थेंबा घातल्याने कोरोना विषाणूचे नायनाट होईल. केलेला असा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. याचे काहीहीही वैज्ञानिक पुरावे नाही की लिंबाचा रस नाकात घातल्याने कोविड -19 चा नायनाट होईल.