वडीलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुखची भावुक पोस्ट
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची आज ७६ वी जयंती आहे. वडीलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुखने जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे रितेशने म्हटले आहे. रितेश देशमुखचे त्याच्या वडीलांसोबत खुप चांगले घट्ट मैत्रीचेही नाते होते. बालपणीचा फोटो शेअर करत ती वेळ पुन्हा यावी अशी भावनाही रितेशने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्यानिमित्ताने रितेश देशमुख याने आपल्या वडीलांसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश देशमुख आपल्या वडिलांशेजारी बसला आहे. रितेशने सफेद रंगाचा शर्ट आणि पॅन्ट असा पेहराव केला आहे. हा फोटो शेअर करत रितेश देशमुख याने लिहिले आहे की, “तुमची आठवण आल्याशिवास एकही दिवस जात नाही. परंतु आठवण आल्यावर एक वेदना जाणवते ती कधीही जात नाही” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुमची नेहमी आठवण येते अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवर रितेश देशमुख यांने लिहिली आहे.