रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (14:58 IST)

नीट परिक्षा आता फक्त ६ परिक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मनस्ताप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं अनिवार्य झालेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परिक्षा अर्थात ‘नीट’ची अत्यंत अपुरी तयारी केली आहे.यामध्ये इतक्या मोठ्या असलेल्या महाराष्ट्रासाठी फक्त सहाचं परिक्षा केंद्र मंजूर झाले आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला मुंबईला आणि विद्यार्थ्याला नागपूरला जावून परीक्षा देण्याशिवाय पर्याय नाही. हे आर्थिक आणि वेळच्या दृष्ट्या फार महाग होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.  तर यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला किमान दहा हजार भुर्दंड लागणार आहे. 20 हजार लोकसंख्येचं औराद शहजानी महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. इथून नीटच्या परीक्षेसाठीचं औरंगाबाद केंद्र गाठण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास करुन आधी लातूर, लातूरहून 280 किलोमीटरचा प्रवास करत औरंगाबादला जायच आहे. बसने प्रवास केला तर परीक्षार्थ्याला जाऊन- येऊन हजार रुपये लागनार आहे . परीक्षार्थ्यासोबत पालक औरंगाबादला गेले तरे दहा हजार रुपये खर्च येईल.त्यामुळे सरकार काय झोपून नियोजन करतय का वेळखावू प्रकार करत आहे.