शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2017 (09:18 IST)

भारताकडून पाकिस्तानच्या 39 कैद्यांची सुटका

पाकिस्तान सोबतचे संबंध  सुधारण्यासाठी  भारताने पाकिस्तानच्या 39 कैद्यांची सुटका केली आहे. भारतीय सैन्याने वाघा बॉर्डरवर 39 कैद्यांना पाकिस्तानच्या ताब्यात दिले आहे. यामधील 21 कैद्यांनी त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा पूर्ण केली आहे. भारताकडून सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये 18 मच्छिमारांचा समावेश आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सुटका करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या कैद्यांना पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले आहे. याआधी मागील महिन्यात सीमा सुरक्षा दलाने नजरचुकीने भारतीय भूमीत आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला मायदेशी पाठवले होते. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानने 217 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानने 447 भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे.