Marathi Biodata Maker

केरळमध्ये मानव बळी प्रकरण, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी 2 महिलांचा घेतला जीव

Updated: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (12:04 IST)
 
या प्रकरणातील आरोपी भगवल सिंग, त्याची पत्नी लैला आणि मोहम्मद शफी यांचे जबाब मंगळवारी नोंदवण्यात आले. आर्थिक विवंचनेवर मात करून समृद्धी मिळवण्यासाठी आरोपींनी महिलांचा बळी दिला होता.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींच्या वतीने वकील बी. ए. अलूर प्रस्तु झाले जे अनेक खळबळजनक प्रकरणांमध्ये आरोपीचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांचे वय 50 ते 55 वर्षे दरम्यान आहे. त्यापैकी एक कडवंथरा येथील रहिवासी होती तर दुसरी जवळच असलेल्या काल्डी येथील होती. यावर्षी अनुक्रमे सप्टेंबर आणि जूनपासून त्या बेपता होत्या. त्यांच्या शोधात गुंतलेल्या पोलिसांना तपासादरम्यान ही घटना मानवी बळी याशी संबंधित असल्याची माहिती मिळाली होती.

महिलेच्या अपहरण प्रकरणात एर्नाकुलम येथील शफी नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले असून त्याने महिलेला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देऊन तिला पठाणमथिट्टा येथे नेले. येथे त्यांनी एका तांत्रिकासमोर स्त्रीला मानवी बळी म्हणून सादर केले. सीएच नागराजू यांनी सांगितले की, त्यांचा पठाणमथिट्टा येथे बळी देण्यात आला. मानव बळी विधी तीन जणांनी मिळून केला. महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 56 तुकडे करण्यात आले. तांत्रिकाने महिलेचे तुकडे घराच्या मागील अंगणात पुरले. महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या आहेत.
 

Edited by: Rupali Barve

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments