Marathi Biodata Maker
✕

कर्नाटकमध्ये मोबाईलचा अतिवापर केल्याबद्दल पालकांनी रागावले, मुलाने विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

Updated: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (10:29 IST)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,16 वर्षीय विद्यार्थी सोमवारपासून बेपत्ता झाल्यानंतर पोलीस आणि त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते, पण मंगळवारी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. मिळालेल्या माहितीनुसार  हा विद्यार्थी सोमवारी सायंकाळी कॉलेजमधून घरी परतला नाही तेव्हा त्याचे पालक आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी त्यांना त्याची शाळेची बॅग विहिरीजवळ सापडली आणि नंतर त्याच विहिरीत त्याचा मृतदेह सापडला.
 
मिळालेल्या माहितीनुसार मोबाइल फोनचा अतिवापर केल्याबद्दल त्याच्या पालकांनी एक दिवसापूर्वी त्याला रागावले होते. याकरिता त्याने हे पाऊल उचलेले. या घटनेसंदर्भात हिरियाडका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टम करून मंगळवारीच कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments