ganesh chaturthi
✕

जयललिता यांना डिस्चार्ज मिळणार

Updated: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (12:05 IST)
 
जयललिता यांना 22 सप्टेंबररोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी अपोलो रुग्णालयाचे डॉ. प्रताप रेड्डी यांनी जयललिता यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.
 
डॉ. रेड्डी म्हणाले, मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृती सुधारली आहे. त्यांनी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आजूबाजूला काय सुरु आहे, त्यांना काय हवे हेदेखील त्या सांगत असल्याचे रेड्डी यांनी नमूद केले. अतिदक्षता विभागातून लवकरच त्यांना खासगी खोलीत हलवले जाईल अशी माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी सकाळी दिली होती. ह्रदयरोज तज्ञ, श्वास चिकित्सक, संसर्गजन्य रोगांचे तज्ञ आणि मधूमेह विशेषज्ञ यांच्या देखरेखीखाली जयललिता यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
68 वर्षीय जयललिता या दीड महिन्यांपासून रुग्णालयात भरती असल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. जयललितांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत दाखल झाले. पण त्यांनादेखील जयललिता यांची भेट घेण्यास मज्जाव करण्यात आले होते. जयललितांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी पूजाअर्चनाही सुरु होत्या. शुक्रवारी डॉक्टरांनी जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट करताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. एआयएडीएमकेच्या नेत्या सी आर सरस्वती म्हणाल्या, आम्ही खूप आनंदात आहोत, आम्ही अम्मासाठी (जयललिता) प्रार्थना करत होतो कारण आमच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. जयललिता यांच्या आजारपणामुळे राज्यपालांनी जयललितांकडील सर्व खात्यांचा कार्यभार दुसर्या मंत्र्यांकडे सोपवला होता.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख