Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेघालय: बेकायदेशीर कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 18 लोकांचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 (11:21 IST)
ALSO READ: नेपाळमध्ये भीषण अपघात; बस टेकडीवरून खाली कोसळली, ८ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार ईशान्येकडील मेघालय राज्यात एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. येथील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू झाला. अजूनही अनेक जण अडकल्याचे वृत्त आहे. अधिकृत माहितीनुसार, मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका "बेकायदेशीर" कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात १८ कामगारांचा मृत्यू झाला. अनेक जखमी कामगार अडकल्याची भीती आहे.
 
पोलिसांनी सांगितले की ही घटना थांगस्कू परिसरात घडली आहे आणि बचाव पथके शोध मोहीम राबवत आहे. आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. स्फोटाच्या वेळी खाणीत किती लोक होते याची नेमकी संख्या माहित नाही. आणखी बरेच जण अडकल्याची भीती आहे.
ALSO READ: मेघालयातील "बेकायदेशीर" कोळसा खाणीत स्फोट, १६ कामगारांचा मृत्यू
खाणीत गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा म्हणाले, "...पूर्व जैंतिया हिल्समधील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत डायनामाइटचा स्फोट झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली. सध्याच्या अहवालांनुसार, या स्फोटात अंदाजे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी झाली आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसडीआरएफची एक टीम आणि एनडीआरएफचे अनेक कर्मचारी घटनास्थळी आहे. पूर्व विभागाचे पोलिस महानिरीक्षकांसह पोलिस विभागही घटनास्थळी आहे. खाण विभागाचे अधिकारी देखील उपस्थित आहे. स्थानिक प्रशासन देखील उपस्थित आहे. "
ALSO READ: वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments