गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य आहे : मोहन भागवत

नागपूर - गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी. त्यांना दंड व्हावा असं स्पष्ट मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात दस-यानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. गायींना वाचवण्यासाठी हिंसा करणा-यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. मुळात गोरक्षा करणारे हिंसा करुच शकत नाही, धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य आहे असं मोहन भागवत यांनी सांगितले.  
 
मोहन भागवत यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य करत आपलं मत मांडलं. रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मोहन भागवत बोलले की, 'बांगलादेशी घुसखोरांची समस्या अद्याप सुटली नसताना आता रोहिंग्यांचा प्रश्न पुढे आला आहे. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भर पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. माणुसकी वैगेरे ठीक आहे पण आपला विनाश करुन माणुसकी दाखवता येत नाही'. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.