रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (10:38 IST)

खात्यात दुसर्‍याचे पैसे जमा केल्यास कारवाई

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा साठवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आपला काळा पैसा नियमित करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत. याचीच दखल घेत अर्थ मंत्रालयानं आता अशा व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. अनेक ठिकाणाहून तशा तक्रारी मिळत आहेत. काळा पैसा बाळगणारे गरीब आणि जनधन अकाउंटधारकांना पैसे देत आहेत. यामध्यामातून ते काळा पैसा नियमित करुन घेत आहेत. मात्र, सरकारची त्यावर करडी नजर आहे.
 
पण तुमचा पैसा काळा नसेल आणि तुम्ही बँकेत भरत असलेले पैसे गेल्या अनेक वर्षातील घरातील बचत आहे. तर असे पैसे बँकेत जमा करण्यास काहीही हरकत नाही. त्यासाठी तुमची चौकशी होणार नाही.
 
म्हणजेच,
 
1 लाख रुपयांवर 30% प्रमाणे त्यानुसार दोन लाखांवर 60 हजार टॅक्स द्यावा लागेल.
 
तसेच 60 हजारावर 200 टक्के दंड आकारण्यात येईल. म्हणजेच एकूण 1 लाख 20 हजार दंड होईल.
 
म्हणजेच दंड आणि कर मिळून, दोन लाखांपैकी तब्बल 1 लाख 80 हजार रुपयांवर पाणी सोडावं लागेल.