Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंदाची बातमी ! केरळमध्ये मान्सूनचे आगमन, बाकी देशात कधी येणार?

Updated: गुरूवार, 30 मे 2024 (16:17 IST)
 
5 जूनपर्यंत मान्सून पूर्वेकडील राज्यांमध्ये पसरेल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला धडकलेल्या 'रेमाल' चक्रीवादळाने भूमध्य समुद्रातून मान्सून बंगालच्या उपसागरात खेचल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे मान्सूनचे पूर्व भारतात 2 दिवस आधी आगमन झाले. केरळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत असला तरी आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. केरळनंतर मान्सून आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, आसाममध्ये दाखल होणार आहे. यानंतर मान्सून देशाच्या इतर भागात पसरेल. सध्या देशात अल निनोची परिस्थिती आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला नीना परिस्थिती देखील उद्भवू शकते.
 
पावसाळ्यात कुठे आणि कसा पाऊस पडेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी हवामान खात्याने सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. यावेळी देशातील सुमारे 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
पावसाचा अंदाज
सामान्यपेक्षा जास्त पाऊस- केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
सामान्य पाऊस - छत्तीसगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, लेह लडाख.
सामान्यपेक्षा कमी पाऊस- ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments