1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2024 (20:07 IST)

मुंबईत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळून 35 जखमी

मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.घाटकोपर येथील पंत नगर भागात एका पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग व शेड कोसळून अपघात झाला या अपघातात 35 जण जखमी झाले आहे. तर 70 ते 80 चारचाकी गाड्या या होर्डिंग खाली अडकल्या. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पुढील बचाव कार्य सुरु असल्याची माहीती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. खराब हवामानामुळे मुंबईत विमानसेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे काही काळ बंद करण्यात आली. 

मुंबईत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहे. वादळी वाऱ्यानंतर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाऱ्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही काळ मुंबई मेट्रो, मध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली. 

मुंबईत वडाळ्यात वादळी वाऱ्यामुळे टॉवर कोसळून अपघात झाला. या मध्ये टॉवर खाली दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात यश झाले आहे. तर या घटनेमुळे 4 ते 5 गाड्यांना नुकसान झाले आहे. अपघातांनंतर अग्निशमन दलाने धाव घेत गाडीतून जखमी झालेल्या व्यक्तीला बाहेर काढले आहे. 

जोगेश्वरी पूर्व येथे मेघवाडी नाका शाखेजवळ मोठं झाड कोसळून अपघात घडला आहे. या झाडाखाली काही मुलं खेळत होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.वादळी वाऱ्यामुळे मध्ये रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.   
 
Edited by - Priya Dixit