शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 (17:22 IST)

वाय फाय स्थानकावरील पॉर्न साईट्स बंद

संपूर्ण देशात बदनामी होत असलेल आणि  रेल्वे स्थानकातील सर्वाधिक  पॉर्न पाहिले जाणारे स्टेशन पाटणा अशी वाईट ओळख निर्माण झाली होती. यावर कारवाई करत पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय वापरुन पाहिल्या जाणा-या पॉर्न साईटस रेल्वेने  ब्लॉक केल्या आहे.

रेल टेलने नुकत्याचा केलेल्या सर्वेक्षणात पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सुविधेचा सर्वाधिक वापर पॉर्न साईटस पाहण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे रेल्वेची मोठी बदनामी होत होती असा निष्कर्ष काढला गेला. 
 
पाटणा जंक्शनमध्ये  पॉर्न साईटस बंद करण्याची प्रक्रिया रेल टेलने सुरु केली आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणा-या सर्व महत्वाच्या स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा ट्रेनची माहिती जाणून घेण्यासाठी दिली आहे. या वाय फाय चा उपयोग चांगला व्हावा असे रेल्वेने म्हटले आहे.