साईभक्ताकडून साडे ३ कोटीचे १२ किलो सोन्याचे कठडे अर्पण
हैद्राबाद येथील साईभक्त भास्कर रेड्डी यांनी साईबाबांना रामनवमी उत्सवानिमित्त सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे बारा किलो सोन्याचे कठडे दान केले आहे. या दानातून साईबाबांच्या समाधीचे कठडे सोन्याने मढविण्यात आले आहे. रामनवमीच्या दिवशी ते साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. समाधीच्या बाजुला असलेल्या व पादुकांच्या लगत असलेल्या मार्बलच्या कठड्यांना हे सोन्याचे आवरण लावण्यात येणार आहे. यापूर्वी या कठड्यांना चांदीचे आवरण होते.