शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:26 IST)

शाहनवाज हुसेन यांचे अन्सारींच्या टीकेला उत्तर

देशातील मुस्लीम असुरक्षित असल्याचे मत व्यक्त करणारे भारताचे मावळते उपराष्ट्रपती हामीद अन्सार यांना भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी उत्तर दिले आहे. जगात मुसलमानांना राहण्यासाठी भारतासारखा चांगला देश कुठेच नाही. इतकेच नव्हे, तर हिंदूसारखा चांगला मित्रही मिळू शकणार नाही, असे वक्‍तव्य भाजप नेते शहानुवाज हुसेन यांनी केले आहे. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असून, ते आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आनंद घेत राहू शकतात, असे हुसेन यांनी म्हटले. भाजप नेत्या प्रीती गांधी म्हणाल्या, ज्या हिंदूबहुल देशात आपण सत्तेच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचलात. तिथे तुम्हाला असुरक्षितपणा कसा जाणवत आहे?