आचारसंहितेचा एक काळ असतो तसा नोटीस पिरेडचाही एक काळ असतो. योग्य वेळी तुम्हाला ते कळेलच असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. सत्तेतून कधी बाहेर पडणार या प्रश्नावर ते बोलत होते. मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पटेल समाज यांचे हार्दिक पटेल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. हार्दिकची बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्याची इच्छा होती. म्हणून तो मातोश्रीवर आला असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. न्याय हक्काच्या लढाईत शिवसेना आणि हार्दिक पटेल एकत्र आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.