Festival Posters
✕

रेल्वे रुळावर रील बनवणे महागात पडले, ट्रेनची धडक बसून 3 जणांचा मृत्यू

Updated: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (11:31 IST)
 
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मसुरी पोलिस स्टेशन हद्दीतील कल्लू गढी रेल्वे गेटजवळ एक तरुणी आणि दोन तरुण ट्रॅकवर उभे असताना रील बनवत होते. तिघेही रील बनवण्यात इतके मग्न झाले होते की रेल्वे रुळावर ट्रेन आल्याचेही त्यांना जाणवले नाही.
 
रेकॉर्डिंगमध्ये हरवून या वेड्या लोकांनी ना ट्रेनचा हेडलाइट पाहिला ना हॉर्न ऐकला. ट्रेनने तिघांनाही आपल्या कवेत घेतले. माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
 
पोलिस अधिकारी डॉ. इराज राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी आणि दोन तरुणांची रील रेकॉर्ड केली जात असल्याची माहिती स्टेशन मास्टरने पोलिसांना दिली होती. त्यानंतर सोशल मीडियाची आवड असलेले तिघेही भरधाव वेगात येणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेस गाडीच्या धडकेत आले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत तरुणीचे वय अंदाजे 22 ते 25 वर्षे असून दोन्ही तरुणांचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असल्याचे समजते.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments