आयटी क्षेत्रातील मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंपन्यांनी घ्यावी – आ. विद्या चव्हाण
पुण्यातील इन्फोसिस कंपनीमध्ये एका इंजिनिअर मुलीची कंपनीच्या एका सुरक्षा रक्षकानेच हत्या केल्याची घटना ही दुर्दैवी असून या घटनेमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित कंपन्यांनी घ्यावी, त्यासाठी सरकार व पोलिस यंत्रणेने संबंधित आयटी कंपन्यांना नोटीसा पाठवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आ.विद्या चव्हाण यांनी केली आहे.
पुण्यातील घडलेल्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे.एकीकडे भाजप सरकार नारी बचावच्या केवळ घोषणा देत आहे, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही ठोस स्वरुपाची उपायोजना करीत नसल्याची टीका यावेळी चव्हाण यांनी सरकारवर केली.