Marathi Biodata Maker
✕

नवरात्र सांयकाळची पूजा

Updated: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (15:34 IST)
श्री महाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती- नवदुर्गा देवताभ्यो नम: । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ॥
फुले वाहावी
 
धूप- 
वनस्प्तिरसोदभूतो गंधाढयो गंध उत्तम: । आघ्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहाकाली- श्रीमहालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा- देवताभ्यो नम: । सुवासार्थे धूपं समर्पयामि ॥
धूप, उदबत्ती ओवाळावी
 
नीरांजनदीप-
आज्यं च वतिंसंयुक्तं वन्हिना योजितं मया । दीपं गृहाण देवशि त्रैलोक्यतिमिरापह ॥
श्रीमहाकाली-श्रीमहालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । दीपार्थे नीरांजनदीपं समर्पयामि ॥
उजव्या हाताने नीरांजनदीप ओवाळावा व डाव्या हाताने घंटा वाजवावी
 
नैवद्य -
नैवद्यं गृह्यतां देवि भक्तिं मे ह्यचलां कुरु । 
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम्‍।
श्रीमहाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । 
नैवेद्यार्थे यथाशत: दुग्ध- शर्करा- नारिकेलफलचूर्ण - पंचखाद्य-नैवेद्यं - समर्पयामि ॥
 
जे पदार्थ अर्पण करावयाचे असतील ते एका ताटात ठेवून व पाण्याने चौकोनी मंडल करुन त्यावर ठेवावे.
त्याभोवती पळीभर पाणी फिरवून ताम्हनात तुलसीयुक्त पाणी सोडावे. आपला डावा हात स्वत:च्या डोळ्यावर धरुन उजव्या हाताने जणू आपण देवीला भरवीत आहोत अशा प्रकारे कृती करावी.
 
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा ।
ॐ ब्रह्मणे स्वाहा । नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ॥
 
पळीभर पांणी अर्पण करुन पुन्हा स्वाहाकार म्हणावे व नंतर तीन पळ्या पाणी ताम्हनात सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि
 
नंतर गंधजल अर्पण करुन म्हणावे.
करोद्वर्तनार्थ चंदनं समर्पयामि ॥
 
यानंतर महानीरांजनदीप- कर्पूरदीप - पंचारती ओवाळून आरत्या म्हणाव्या. प्रार्थना म्हणावी. मंत्रपुष्प श्री देवीला समर्पण करावे. नंतर प्रदक्षिणा घालावी, नमस्कार करावा व 
 
पूजा समाप्तीचे पूढील मंत्र म्हणून प्रार्थना करावी-
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्‌ । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि यत्पूजितं मया देवि परिपूर्ण तदस्तु मे ॥
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरि ॥
अपराधसहस्त्राणि क्रियंतेऽहर्निशं मया। दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि ॥
क्षमस्व परमेश्वरि ॥ क्षमस्व परमेश्वरि ॥
अनेन कृतपंचोपचार पूजनेन भगवती श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवता: प्रीयताम्।
ॐ तत्सत ब्रह्मार्पणमस्तु । विष्णवे नमो । विष्णवे नमो । विष्णवे नम: । उदयोऽस्तु । जय जगदंब ॥
 
नंतर दोन वेळा आचमन करावे आणि तीर्थग्रहण करावे.
 
नऊ दिवस श्री देवीची व घटाची दिवसा षोडशोपचार व सायंकाळी पंचोपचार पूजा करावी. कुलाचाराप्रमाणे पूजा करावी.

सर्व पहा

सर्वपितृ अमावास्येला ‘या’ १० चुका करू नका, पूर्वजांच्या नाराजीपासून राहा दूर

Sarv Pitru Amavasya 2026 सर्व पितृ अमावस्येला महादेवाला या ५ वस्तू अर्पित करा

सर्वपित्री अमावस्या २०२६: जाणून घ्या तिथी, स्नानादी दानाचा शुभ मुहूर्त आणि श्राद्ध विधी

नवरात्री स्पेशल फराळ थाळी: एकाच वेळी बनवा ४ चविष्ट उपवासाचे पदार्थ

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ९ मंदिरे; नवरात्रीत एकदा तरी दर्शन घ्यावे अशी श्रद्धा

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments