शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:29 IST)

बाप्परे, १६ कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन येणार

आता १६ लेन्स असणारा रियर कॅमेरा सेटअपवाला स्मार्ट फोन ग्राहकांसाठी बनवण्यात येत आहे. हा १६ लेन्सवला स्मार्टफोनचा कॅमेरा ग्राहकांच्या नक्कीच पसंदीत असण्याची शक्यता आहे. या मोबाईल कॅमेरामध्ये एकाचवेळी झटपट फोटो क्लिक करता येतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फोकल लेंथद्वारे फोटो काढण्याची संधीही युझर्सला मिळणार आहे. तसेच पोर्ट्रेट शॉट घेण्यासाठी वाईड फोकल लेंथ हा ऑप्शनही देण्यात येईल. तसेच फोटो काढण्यानंतर तो एडीट करण्याचा देखील पर्याय असणार आहे. मात्र याची किंमतही तशीच दमदार असण्याची शक्यता आहे.
 
दक्षिण कोरियाची किंमत एलजीला युनायटेड स्टेट्स पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिसद्वारे १६ लेन्स रियर कॅमेरा सिस्टिम असणारा स्मार्टफोन बनवण्याचे पेटेंट मिळाल्याची चर्चा आहे. मात्र एलजीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून हा १६ कॅमेराचा फोन केव्हा पर्यंत लॉन्च होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.