Marathi Biodata Maker
✕

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार

Updated: रविवार, 21 जून 2020 (11:10 IST)
 
 कंपनीने या फोनची अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पे यांनी ट्विटकरून या डिव्हाईसचे संकेत दिले आहेत. या ट्विटवरून नव्या OnePlus Z च्या किंमतीचा अंदाज येत आहे. ट्वीटनुसार 299 डॉलर (22,799 रुपये) या फोनची किंमत असणार आहे. हा फोन जुलैमध्ये लाँच केला जाऊ शकतो. कार्ल पे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये 2014 मध्ये केलेले कंपनीचे एक जुने ट्विट एम्बेड आहे. हे ट्विट तेव्हाचे आहे जेव्हा कंपनीने पहिला वनप्लस One लाँच केला होता. या ट्विटमध्ये फोनचे नाव तर नाही घेतले गेलेय परंतू नव्या फोनची किंमत पहिल्या वनप्लसएवढी असण्याची शक्यता आहे.
 
कंपनीने 299 डॉलरला हा स्मार्टफोन लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 16 जीबी मॉडेलची होती. या ट्विटनंतर उडालेल्या अफवांनुसार अॅपलचा आयफोन SE आणि गुगलच्या Pixel 4a ला टक्कर देण्यासाठी हा स्वस्त अँड्रॉईड फोन आणला जाणार आहे. जर या फोनची किंमत 299 डॉलर असेल तर तो आयफोन एसईपेक्षा 100 डॉलर आणि पिक्सल 4ए पेक्षा 50 डॉलरने स्वस्त असणार आहे. सध्या वनप्लसचा कोणताही फोन iPhone SE ला टक्कर देत नाही. वनप्लसने नुकतेच वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो फोन लाँच केले आहेत. ते iPhone 11 आणि गॅलेक्सी S20 चे प्रतिस्पर्धी आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर गेले; पुण्यात विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले

कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनरखाली अडकलेल्या पती-पत्नीचे मृतदेह दुसऱ्या दिवशी बाहेर काढले

लग्न ठरले, प्रियकराचा राग अनावर झाला; प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून दरीत ढकलले

MPSC विद्यार्थी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल, तुकाराम मुंडे यांची नवे सचिव म्हणून नियुक्ती

नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षी धडकला; सुदैवाने मोठा हवाई अपघात टळला

पुढील लेख
Show comments