Festival Posters

आता स्मार्टफोनमध्येच इनबिल्ट प्रोजेक्टर!

बुधवार, 17 जानेवारी 2018 (13:20 IST)
स्मार्टफोनमध्ये प्रोजेक्टर असल्यास किती मजा येईल असा विचार आपण करत असाल, तर आता मोव्हीफोन या मॉडेलमध्ये याच प्रकारचे इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे. मोव्ही कंपनीने दोन वर्षांपूर्वीच स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट प्रोजेक्टर देण्याचे घोषित केले होते. या मॉडेलची तेव्हा प्राथमिक माहितीदेखील देण्यात आली होती. तथापि, आता हा प्रोजेक्टरयुक्त स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार असून याचे लास व्हेगास शहरात सुरू असलेल्या सीईएस-2018 या प्रदर्शनात अनावरण करण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या वरील बाजूस पिको कंपनीचे प्रोजेक्टर देण्यात आले आहे. याच्या मदतीने एचडी म्हणजेच 720 पिक्सल्स क्षमतेच्या प्रतिमा आणि चलचित्र प्रक्षेपित करून 200 इंच आकारमानाच्या स्क्रीनवर पाहता येतात. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोन कसाही फिरवला तरी पडद्यावर  उमटणार्‍या प्रतिमा वा व्हिडिओ या आपोआप अ‍ॅडजस्ट होतात. खरं तर अलीकडच्या काळात अत्यंत आटोपशीर आकाराचे प्रोजेक्टर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एखाद्या स्मार्टफोनमध्येच अशा प्रकारची सुविधा असल्यास पोर्टेबल प्रोजेक्टरची गरजदेखील उरणार नाही. तत्काळ एखादे प्रेझेंटेशन दाखविण्यासह शैक्षणिक वा मनोरंजन बाबींसाठी याचा वापर होऊ शकतो. यामुळे अर्थातच हे मोव्हीफोनमधील सर्वात लक्षणीय फीचर मानले जात आहे. उर्वरित फीचर्सचा विचार केला असता यात 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेक एटी6750 प्रोसेसर असून 3 जीबी रॅम /32 जीबी स्टोअरेज आणि 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय असतील. हे स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढविता येईल. या स्मार्टफोनमध्ये 13 व 8 मेगापिक्सल्सचे मुख्य व फ्रंट कॅमेरे आहेत. तर यातील 4,000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर चार तासांपर्यंत प्रोजेक्टर चालवता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अर्थात फुल   बॅटरी असल्यास एखादा चित्रपट पाहणे सहजशक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. याचे मूल्य 599 डॉलर्स (सुारे 38 हजार रूपये) इतके असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मोव्ही कंपनीने दिली आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: छगन भुजबल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

जून महिन्यात ह्युंदाई क्रेटा, वारणा आणि i20 वर किती सूट देत आहे? नवीनतम तपशील येथे तपासा

‘माणसे पैशाने नव्हे तर प्रेमाने जिंकली जातात’; सुप्रिया सुळेंच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पलटवार

पुण्यात गॅस सिलेंडर गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Goat Farming शेळीपालनातून लाखोंची कमाई? जाणून घ्या यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव

पुढील लेख
Show comments