1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा

वर्षा उसगावकरांकडून सासरे रवी यांचा छळ?

IFM
IFM
'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार रवी यांनी मुलगा आणि सुनेकडून आपला छळ होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल केली आहे. मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर रवी यांची सून आहे.

८४ वर्षीय रवी यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत मुलगा अजय व सून वर्षाकडून आपला मानसिक छळ होतो आहे, असे म्हटले आहे. रवी यांचा सांताक्रूझ येथे दुमजली बंगला आहे. त्यातील पहिला मजला मुलगा व सुनेने बळकावल्याचे रवी यांचे म्हणणे आहे. रवी सध्या तळमजल्यावर रहात आहेत. त्यांना पहिल्या मजल्यावर जाण्यावर बंदी घातली आहे. पहिल्या मजल्यावर शकील, मुकेश, शंकर जयकिशन यांच्यासारखे बडे बडे कलावंत येत असत. रियाझ करत असत. तिथेच रवी यांना मिळालेले पुरस्कार, मानपत्रे ठेवली आहेत. पण त्याकडे मुलगा सून दुर्लक्ष करत असून ती धूळ खात पडली आहेत, अशी त्यांची तक्रार आहे.

रवी यांच्या तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी काही चित्रपट कलावंतांच्या साथीनेच वरच्या मजल्याचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश मिळवला. त्यांच्या मुलाचे २००० मध्ये वर्षा उसगावकर यांच्याशी लग्न झाले. ते रवी यांना मान्य नव्हते. त्यांनी या दाम्पत्याला रहाण्यासाठी म्हणून तात्पुरती वरच्या मजल्याची जागा दिली होती. पण ती त्या दोघांनी बळकावली, असे त्यांचे म्हणणे आहे.

रवी जुन्या काळातील बडे संगीतकार असून आज मेरे यार की शादी है किंवा बाबूल की दुवाए लेती जा यासारखी अनेक अवीट स्मरणीय गीते त्यांनी दिली आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा