Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'स्टार्टअप' ला यशस्वी करण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स

Updated: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (13:54 IST)
 
 नक्कीच आपल्याला नवे प्रयोग केले पाहिजे. यशस्वी होण्यासाठी कामाच्या नव्या पद्धती शिकणे गरजेचे आहे. या साठी आपण कोणतीही कोताही करू नये. या मुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता वाढते. 
 
तथापि आपले लक्ष एकच असावे, आणि आपल्याला त्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी चांगले मार्ग शोधायला पाहिजे. कोणतेही प्रयोग सुरुवातीस पूर्ण नसतात पण सतत प्रयत्न करून आणि त्यामध्ये सुधारणा करून ते परिपूर्ण होतात. 
 
म्हणजे या साठी आपल्याला नव्या गोष्टी शिकायला पाहिजे. या साठी आपण एखादा नवीन कोर्स देखील करू शकता, काही नवीन लोकांकडून सल्ले देखील घेऊ शकता. हे सर्व आपण करावे या मुळे आपल्याला नवी प्रेरणा मिळेल जी आपल्याला सतत यशाच्या मार्गाकडे वाढण्यासाठी प्रेरित करेल. 
 
आपण स्वतः देखील सर्जनशील व्हावे आणि आपल्या कार्यसंघाला किंवा टीम ला देखील सर्जनशील बनवावे. स्टार्टअप मध्ये कोणते ही व्यक्ती एकटे नसून त्याच्या सह बरेच सहकारी असतात, तसेच ग्राहक देखील त्यांच्या सह जोडलेले असतात. त्यांच्याशी मोकळे होता आलं पाहिजे. या साठी आपण असे वातावरण निर्माण करावे जी आपल्याशी जोडलेल्या प्रत्येकाला आरामदायक वाटले पाहिजे. नेहमी सर्वांना महत्त्व द्यावे. असं केल्यानं आपल्याला पुढे वाढण्यात मदत देखील मिळेल.
 
* कामाचे तास वाढविण्यात संकोच बाळगू नका - 
या विषयाबद्दल प्रत्येकाचे वेग वेगळे मत असू शकतात. पण कधी एखादी वेळ अशी असते की सर्वांचे मत एक होतात. कोणत्याही स्टार्टअप मध्ये असे बरेचशे कार्य केले जातात या मध्ये बरेच प्रयोग अशी असतात जी अयशस्वी होतात. या साठी आपल्याला त्या कार्यांना यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक वेळ द्यावे.
 
तर मग स्टार्टअप ला एखाद्या नित्यक्रम म्हणून घेण्याऐवजी अधिकाधिक वेळ द्यावे. आपल्या सहयोगिनां देखील कामाला यशस्वी करण्यासाठी अधिक वेळ देण्यासाठी प्रेरित करावं. जेणे करून स्टार्टअप च्या आवश्यकतांना पूर्ण करता येईल आणि योग्य दिशेला वाढता येईल. वेळ दिल्यानं आपल्या सर्व समस्या दूर होतील. या बद्दल काहीही दोन मते नाहीत.
 
* दबाव घेणं टाळावे -
 स्टार्टअप मध्ये याची सर्वात जास्त आवश्यकता असते. बऱ्याच वेळा असे होते की आपल्याला काही समजत नाही पण आपण त्यासाठी आपला वेळ आणि डोकं लावत असतो.
 
बऱ्याच वेळा वरच्या पक्षाकडून आपल्यावर दबाव आलेले असते आणि आपण त्या परिस्थितीला सहज घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला नैराश्य येत आणि आपले स्टार्टअप नैराश्याने ग्रासले जाऊ शकतं. म्हणून दबावाच्या खाली असून देखील आपल्याला आपल्या कामाला कौशल्यानं करण्यामध्ये सतत सुधारणा करायला हवी. कधीही हार मानू नका. हीच एकमेव अशी गोष्ट आहे जी नेहमीच मार्ग मोकळे करण्यास सक्षम असते. 
 
* कामावर नेहमी प्रेम करावे - 
ही फार महत्त्वाची बाब आहे जर आपण कामावर प्रेम केले नाही तर ते आपल्यासाठी  कंटाळवाणी आणि ओझं वाटू लागत. दुसरी कडे जर आपण कामावर प्रेम केलं आणि त्याला एका मुलाप्रमाणे जपलं तर नक्कीच हे आपल्यासाठी यशाचे मार्ग उघडतात.
 
लक्षात घ्या की आपण या स्टार्टअपचे मालक आहात! जर का आपण याला एखाद्या मुलासारखे जपले तर आपल्याला आपल्या स्टार्टअप ऑफिसात स्वच्छता करायला देखील काहीच कमीपणा वाटणार नाही आणि या साठी मोठ्या मीटिंग घेण्यास देखील कौशल्य दाखवू शकता. जी एखाद्या स्टार्टअप साठी आवश्यक असते. 
या पात्रतेव्यतिरिक्त शिस्तबद्धता देखील तितकेच आवश्यक आहे. लक्षात ठेवा की शिस्तबद्धता म्हणजे एखाद्या वर हुकूम गाजवणे नसून स्वतःला शिस्त लावणं आहे. जर आपण स्वतः ला शिस्त लावाल तर विश्वास ठेवा की आपली सम्पूर्ण टीम किंवा कार्यसंघ देखील याचा मनापासून स्वीकार करेल. अशा परिस्थितीत वेळेचे व्यवस्थापन आपल्यासाठी बरेच सोपे होईल. आपण शिस्तबद्धता ने वागत असाल तर आपल्याला ऑफिसच्या लोकांसहची ट्यूनिंग चांगली दिसून येईल जी आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

चायनीज-स्टार्टर्समधील सर्वात लोकप्रिय पदार्थ Crispy Honey Chilli Potato

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments