Daily Horoscope
✕

दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या पुण्यातील एअर होस्टेसची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; जंगलात आढळला मृतदेह

Updated: सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 (15:22 IST)
 
मृत महिलेची ओळख वर्षा पूरणलाल तुरकर (वय ३५, रा. किन्ही-नावेगाव, वारासिवनी तालुका, बालाघाट जिल्हा, मध्य प्रदेश) अशी पटली आहे. तिच्यासोबत असलेल्या नितेश अग्रवाल याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले आणि त्यानंतर वर्षावर हल्ला केला. या आधारे दावनीवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षाने २०१९ मध्ये पुण्यातील एका व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. ती पुण्याच्या धानोरी भागात राहत होती आणि 'एअर इंडिया'मध्ये एअर होस्टेस  म्हणून कार्यरत होती. तिचे पती सध्या इंदूर येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. दिवाळी सणानिमित्त वर्षा आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह मध्य प्रदेशातील आपल्या मूळ गावी, किन्ही-नावेगाव येथे आली होती. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० च्या सुमारास, तिने आपल्या मुलीला आई-वडिलांकडे सोडले आणि गोंदियातील मनोहर चौक येथे राहणाऱ्या नितेश नरेश अग्रवाल (वय ४१) याच्यासोबत कारने तिरोड्याकडे प्रस्थान केले.
 
चाकूचा धाक दाखवून लूट
या दोघांनी आपली कार अर्जुनी-बोंद्रानी येथील वैनगंगा नदीकाठी असलेल्या श्रीराम मंदिराच्या जवळील जंगलमय भागात उभी केली होती. नितेशने पोलीस आणि मृत महिलेच्या नातेवाईकांना सांगितले की, सायंकाळी ५:३० ते ६:०० च्या दरम्यान, जेव्हा ते जंगलात बसून बोलत होते, तेव्हा तीन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटले आणि त्यानंतर वर्षाच्या पोटात धारदार चाकूने वार करून तेथून पळ काढला.

गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच, वर्षाचे नातेवाईक मध्य प्रदेशातील खैरलांजी येथून घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील वर्षाला खैरलांजी येथील रुग्णालयात नेले; मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, तिचा मृत्यू घटनास्थळीच झाला असावा. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दावनीवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. दावनीवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर-३'ची चर्चा; अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात! संजय शिरसाटांचे मोठे विधान

अवघ्या ३ आठवड्यांत तिसरे चक्रीवादळ! बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ धडकणार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

IRCTC वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता एका मिनिटात बुक होणार २२०० ट्रेनची तिकिटे

५.७४ लाखांच्या 'या' SUV ने गाजवले मार्केट; अवघ्या १० महिन्यांत २ लाखांहून अधिक ग्राहकांची पसंती!

राजकीय भूकंप! रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर शिंदे गटाच्या वाटेवर

पुढील लेख
Show comments