Dharma Sangrah
✕

Pune: मद्यधुंद अवस्थेत वाहन चालकाने 12 जणांना चिरडले,चालकासह दोघांना अटक

Updated: रविवार, 1 जून 2025 (12:29 IST)
ALSO READ: पुण्यात पीएमपीएमएलबसने प्रवास करणे महागणार,रविवार पासून नवीन दर लागू
पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना उडवले.प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, बिबवेवाडी येथील रहिवासी जयराम मुळे (27) हा चालक घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी गाडीत एक सहप्रवासीही होता.
 
पोलिसांनी सांगितले की, चालक आणि वाहन मालक दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जखमींपैकी अनेकांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही.पोलिसांनी कायदेशीर करावाई सुरु केली आहे. 
ALSO READ: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी नीलेश चव्हाणला अटक
या प्रकरणी पोलिसांनी कार चालक जयराम शिवाजी मुळे (27) आणि कारमध्ये बसलेला त्याचा मित्र राहुल गोसावी यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.
 
या अपघातात जखमी झालेल्या इतर तीन जणांची नावे कळू शकलेली नाहीत. त्यापैकी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या 9 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

रामलल्लांचे अंगण १,००,००० दिव्यांनी उजळणार, अयोध्या ऐतिहासिक दीपोत्सवासाठी सज्ज

LIVE: शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले

रायझिंग स्टार आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, वैभव सूर्यवंशीचा समावेश, कर्णधारपद तिलक वर्माकडे

बीसीसीआयने आयपीएल रिटेन्शनची अंतिम मुदत वाढवली; भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामुळे निर्णय घेण्यात आला

पुढील लेख
Show comments