रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (16:31 IST)

Pune : खडकवासला धरणात नऊ मैत्रिणी बुडाल्या, दोघींचा मृत्यू

Pune news :पुण्यातील सिंहगड परिसरात खडकवासला धरण्याच्या पाण्यात आज सकाळी खडकवासला धरण क्षेत्रातील गोऱ्हे बुद्रुक येथील कलमाडी फार्म हाऊसच्या मागील बाजूस कपडे धुण्याकरता आणि आंघोळी करता या मुली आल्या होत्या. त्यावेळी या 9 मुली पाण्यात उतरल्या. तर एक महिला कडेला आंघोळ करत होत्या. पाण्यात उतरलेल्या मुलींना पाण्याचा अंदाज आली नाही, त्यामुळे त्या बुडू लागल्याचे दिसताच बाहेर थांबलेल्या दोन मुलींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. जवळच दशक्रिया साठी आलेल्या काही लोकांनी तातडीने धाव घेत खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुलींपैकी सात मुलींना वाचवले.

दुर्देवाने दोघी मुलींना वाचवू शकले नाही. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्यात दिली पोलीस घटनास्थळी पोहोचून दोघी मुलींचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून दोन मुलींचा शोध सुरू असता त्यांचा मृतदेह मिळाला आहे.कुमुद संजय खुर्द (13), शितल भगवान टिटोरे (15) असे या मयत मुलींची नावे आहेत.  या सर्व मुलीं बुलढाणा येथील आहेत. तसेच या घटनेतील जखमी मुलींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
Edited By -Priya Dixit