Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

Updated: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:41 IST)
 
या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते पुन्हा पक्षात परतण्याच्या तयारीत आहेत. इतकच नाही तर भाजपामधील काही नाराज नेतेही इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. या १२ आमदारांबरोबरच राज्यसभेतील एका खासदारानेही राजीनामा देऊन महाविकास आघाडीबरोबर येत पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. या आगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अनेक नेते भाजपात येणार असे म्हंटले होते. जेव्हा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना सरकारी निर्णयांचा फटका बसला होता. यापैकी अनेक आमदार हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील शिक्षण सम्राट तसेच साखर कारखाना श्रेत्राशी संबंधित होते.
 
कोणते आमदार पक्ष सोडणार?
भाजपचे जे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे, त्यात मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ५ आमदारांचा समावेश आहे. सोबतच आणखी ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. या आमदारांची स्वत:च्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला जाण्याचीही तयारी दर्शवली आहे. राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपचा नाराज राज्यसभा खासदार कोण, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्यामुळे जर असे झाले तर भाजपाला मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा; ठाण्यात एकनाथ शिंदे आणि बीडमध्ये सुनेत्रा पवार यांनी तिरंगा फडकवला

Independence Day 2026 मुख्यमंत्री फडणवीस यांनी सचिवालयात ध्वजारोहण केले तर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुण्यात तिरंगा फडकवला

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची भव्य दूरदृष्टी; 'सप्तधारा'च्या ७ शक्तींद्वारे भारताचे परिवर्तन होईल; या शक्तींबद्दल जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला, जनरेशन-जी आणि जनरेशन-अल्फा यांच्यासाठी एक मोठी घोषणा केली

LIVE: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवालयात ध्वजारोहण केले

पुढील लेख
Show comments