Marathi Biodata Maker

रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडले

गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (19:11 IST)
रत्नागिरीच्या देवरुख नजीकच्या हरपुडे येथील एका इसमाच्या घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडले आहेत. संबंधित घटना ही बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचं नाव सुरेश आत्माराम किर्वे असं आहे. तो हरपुढे येथील मराठवाडी वस्तीत राहतो. त्याच्या घरात बॉम्ब सापडल्याची माहिती उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
आरोपी सुरेश किर्वे याच्या घरात जिवंत गावठी बॉम्ब असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलीस, दहशतवाद विरोधी पथर आणि बॉम्ब शोध व नाशक पथक कामाला लागलं. सुरक्षा यंत्रणांनी आधी सापळा रचला. त्यानंतर सविस्तर माहिती घेत पोलिसांसह इतर पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली. ते बुधवारी हरपुढे येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी योग्य संधी मिळताच आरोपी सुरेश किर्वे याच्या घरात छापा टाकला. यावेळी घरात सापडलेला शस्त्रसाठा बघून पोलीसही चक्रावले.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

रायगडमध्ये मुसळधार पावसानंतरचे एक भयानक दृश्य; पाण्यामध्ये अनेक सिलिंडर खेळण्यांसारखे वाहून गेले

"११० सचिव सरकारकडून पगार घेतात, पण सभागृहात चारही जण उपस्थित नाहीत," महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा संताप

डॉक्टरांवर हल्ला करणारे शिंदे गटाचे नगरसेवक अटकेनंतर आजारी पडले; रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

LIVE: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के बसले

पुढील लेख
Show comments