शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (08:41 IST)

वाटद गाव नदीत ३ कामगार बुडाले

3 workers drowned in Watad village river तालुक्यातील वाटद येथील गाव नदी येथे पोहायला उतरलेले तिघेजण बुडाले. . बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.
 
जयगड पंचक्रोशीतील एका कंपनीच्या सब ठेकेाराकडे काम करणारे तीन कामगार बुधवारी वाटद येथील गाव नदीवर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाण्याचा जोर वाढला आणि यातील एकजण पाण्यात बुडू लागला. त्याने आरडाओरड केल्याने अन्य दोघांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. खोल पाण्यात सापडल्याने तिघेही जण बुडू लागले. यातील एकाने स्वतः चा जीव वाचवला. तर अन्य दोघे खोल पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना या घटनेची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या दोघांची शोध मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह लागला तर दुसऱ्या कामगाराचा शोध उशिरा पर्यंत सुरू होता.