बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (08:20 IST)

नाशिक : येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, ६ ठार

नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना आहे.