मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (16:08 IST)

महामार्गावर एसटीचा भीषण अपघात

accident
धुळ्यात आज सकाळच्या सुमारास एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे
 
 मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही चाळीसगाव येथून प्रवाशांना घेऊन अक्कलकुवाकडे निघाली होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बस धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ आली, त्यात सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.विद्यार्थी आणि प्रवाश्यांना घेऊन ही बस धुळ्याकडे रवाना झाली. तरवडे गाव सोडून 2 किलोमीटर अंतरावर धुळ्याकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने बसला हुलकावणी दिली. यावेळी बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाले असून त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे.
Edited by : Smita Joshi