शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2018 (15:29 IST)

अजितदादांना भावली टपरीवरची कॉफी...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा सातव्या दिवशी हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत असताना अजितदादांना कॉफीची तल्लफ आली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल नव्हते म्हणून चालक गाडी थांबवण्यासाठी थोडे शाशंक होते. मात्र अजितदादांनी कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबवून तिथेच कॉफी पिणे पसंत केले.

नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , आ. विक्रम काळे,यांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून लोकांशी मनमोकळा संवाद साधला. कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधला. टपरीवरील स्पेशल भज्यांचाही त्यांनी आस्वाद घेतला.