बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:16 IST)

राज ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, मात्र कुंचल्याच्या साहाय्याने

हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्यानं नोंदवली आहे.  'अनुदान आणि राष्ट्रधर्म' असं शीर्षक दिलेलं एक व्यंगचित्र राज ठाकरेंनी 'फेसबुक'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलंय. 

अनुदान काढून घेतानाच बांग्लादेशी आणि पाक घुसखोरांना देशातून हाकलून देण्याचा सूचक इशारा पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी आपल्या या व्यंगचित्रातून दिलाय.